मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! महाराष्ट्र राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार पदोन्नती, पहा काय म्हटले मुख्यमंत्री ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सणासुदीच्या काळात मुख्यमंत्र्यांची ही घोषणा राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा मोठा पवित्र सण साजरा झाला आहे.

हिंदू सनातन धर्मात पवित्र समजला जाणारा नवरात्र उत्सवाचा सण साजरा झाल्यानंतर आता पुढल्या महिन्यात दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट होणार आहे. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या आनंदाच्या वातावरणातच राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील 3,000 अंगणवाडी मदतनीस यांना पदोन्नती दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेच्या जनजागृती कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदय यांनी ही घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य शासन राज्यातील जवळपास 3,000 अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका या पदावर पदोन्नत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जवळपास तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना लवकरच अंगणवाडी सेविका या पदावर पदोन्नत केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

यामुळे, निश्चितच सणासुदीच्या काळात राज्यातील अंगणवाडी मदतनिसांना मोठा दिलासा मिळणार असून शासनाने जर ही वचनपूर्ती केली तर या संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेची पूर्ती केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

जाणकार लोकांनी मात्र पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने तसेच राज्यातही विधानसभा निवडणुका होणार असल्याने शासन याबाबत लवकरच निर्णय घेईल आणि संबंधितांना दिलासा देण्याचे काम करेल असे सांगितले आहे. 

Leave a Comment