खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला 8 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Onion Rate : गेल्या महिन्यात दबावात असलेले कांद्याचे बाजारभाव पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. खरंतर, पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैशांची निकड आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या बाजारभावात झालेली ही सुधारणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

निदान यंदाची दिवाळी तरी शेतकऱ्यांची चांगली जाईल अशी आशा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. खरंतर, कांद्याचे बाजार भाव वाढण्यासाठी गेल्या महिन्यात देखील पोषक परिस्थिती तयार झाली होती. मात्र नवरात्र उत्सवाच्या काळात आपल्या देशात कांद्याची मागणी नेहमीच कमी होत असते. हेच कारण आहे की यंदाच्या नवरात्र उत्सवात देखील कांद्याची देशांतर्गत मागणी कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे भारतात विशेषतः हिंदू कुटुंबांमध्ये नवरात्र उत्सवाच्या काळात कांद्याचे आणि लसणाचे सेवन केले जात नाही. याशिवाय नवरात्र उत्सवात मांसाहार देखील सेवन केला जात नाही. याचा परिणाम म्हणून कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात घसरते. हेच कारण होते की नवरात्र उत्सवात यंदा कांद्याचा बाजार भाव वाढीसाठी पोषक परिस्थिती तयार झालेली असतानाही मंदित पाहायला मिळाला आहे.

आता मात्र नवरात्र उत्सव संपला आहे यामुळे आता कांद्याची मागणी वाढत आहे. विशेषता कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मधून कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आता कांद्याचे कमाल बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील कांदा उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत असं म्हटलं तर आता काही वावगं ठरणार नाही. 

कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल अर्थातच 27 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये कालच्या लिलावात 20,234 क्विंटल लाल कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये कांद्याला किमान 200, कमाल 8000 आणि सरासरी चार हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे.

Leave a Comment