तरुण शेतकऱ्याने असं जुगाड बनवलंय की त्यापुढे इंजिनिअरही झालेत फेल ! सायकललाच बनवले भुईमुगाच्या शेंगा तोडण्याच मशीन, पहा खास व्हिडिओ 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Desi Jugad Viral Video : आपल्या भारतात टॅलेंटची कुठलीच कमतरता नाही. देशातील नवयुवक तरुण कमी संसाधनांमध्ये देखील जुगाड करून विविध क्षेत्रात चांगले काम करत आहेत. शेतीमध्ये देखील शेतकरी बांधव कायमच देशी जुगाड करून शेती व्यवसाय सोपा करत आहेत.

अशातच सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने सायकलचा असा जुगाड बनवला आहे की यापुढे इंजिनीयर देखील फेल ठरले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण शेतकरी सायकलच्या चाकात भुईमुगाच्या शेंगा टाकून शेंगा तोडत आहे.

म्हणजेच भुईमूग शेंगा तोडणीसाठी या शेतकऱ्याने मजुराचा वापर न करता जुगाड करून आपले काम पूर्ण केले आहे. खरंतर भुईमूग हे महाराष्ट्रासह संबंध देशभरात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातील जवळपास सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते.

भुईमूग एक प्रमुख तेलबिया पीक आहे. मात्र या पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा तोडण्यासाठी लहान शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. लहान शेतकऱ्यांना भुईमूग तोडण्याचे यंत्र परवडत नाहीत. शिवाय मजुराने भुईमुग तोडण्याचे ठरवले तर याला खूप वेळ लागतो. मजुरी देखील अलीकडे खूपच वाढली आहे.

मजूरटंचाई देखील निर्माण झाली आहे. मजूरटंचाईमुळे वेळेवर मजूर मिळत नाही अशा परिस्थितीत भुईमूग तोडणी करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे भुईमुगाचे पीक उत्पादित करण्यासाठी येणारा उत्पादन खर्च वाढत आहे.

अशा परिस्थितीत एका तरुण शेतकऱ्याने भुईमूग शेंगा तोडण्यासाठी म्हणजे पाल्यापासून भुईमुग शेंगा वेगळ्या करण्यासाठी सायकललाच जुगाडू यंत्र बनवले आहे. या तरुण शेतकऱ्याने सायकल जमिनीवर पाडून सायकलचे चाक उलटे फिरवले आहे आणि या फिरत्या चाकात भुईमुगाचे काढणी केलेले पीक टाकून भुईमुगाच्या शेंगा वेगळ्या केल्या आहेत.

निश्चितच कोणताही खर्च न करता या तरुण शेतकऱ्याने केलेला हा जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी देखील अनेक शेतकऱ्यांनी या जुगाडाच्या माध्यमातून भुईमुगाच्या शेंगा वेगळ्या केल्या आहेत.

Leave a Comment