State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली मोठी वाढ, जीआर पण निघाला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कृषी सेवक या पदावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल दहा हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

याचा शासन निर्णय एक ऑगस्ट 2023 अर्थातच काल निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार कृषी सेवकाचे मानधन आता 16 हजार रुपये प्रति महिना एवढे होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2004 मध्ये राज्य शासनाने कृषी सेवक या पदाची निर्मिती केली होती.

2004 मध्ये कृषी सेवकाला 2,500 रुपये प्रति महिना एवढ वेतन निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर 2012 मध्ये कृषी सेवकाच्या मानधनात वाढ करण्यात आली. त्यावेळी कृषी सेवकाचे मानधन सहा हजार रुपये एवढे करण्यात आले. तेव्हापासून कृषी सेवकाचे मानधन सहा हजार रुपये एवढेच होते.

अर्थातच जवळपास बारा वर्षांपासून कृषी सेवकांना 6000 रुपये एवढे तुटपुंजी मानधन मिळत होते. यामुळे महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी करत होते. खरंतर वाढलेली महागाई पाहता सहा हजार रुपये मानधनावर काम करणे या कर्मचाऱ्यांना अवघड होत होते.

या कर्मचाऱ्यांना एवढ्याशा मानधनात आपला संसाराचा गाडा देखील चालवता येत नव्हता. अशा परिस्थितीत या कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या पार्श्वभूमीवर 27 जुलै 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी सेवकाच्या मानधनात दहा हजार रुपये एवढे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान हा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसात म्हणजेच एक ऑगस्ट 2023 रोजी याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने याचा शासन निर्णय काल निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयानुसार कृषी सेवकांच्या मानधनात शासन निर्णय जाहीर झाल्यापासून अर्थातच एक ऑगस्ट 2023 पासून वाढ केली जाणार आहे. निश्चितच राज्यातील कृषी सेवकांच्या 6000 रुपये पगारात दहा हजार रुपये वाढ झाली असल्याने या संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment