Government Employee News : सध्या देशभरात सणासुदीमुळे आनंदाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात सर्वत्र प्रसन्न वातावरण असून नुकताच देशात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व साजरा झाला आहे. आता पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट केला जाणार आहे.
यामुळे आत्तापासूनच बाजारात मोठी चमक पहायला मिळत आहे. कपडे, सोन्या, चांदीच्या आभूषणाच्या खरेदीसाठी बाजारामध्ये मोठी गर्दी होत आहे. अशा या आनंदाच्या आणि प्रसन्नाच्या वातावरणात देशातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय झाला आहे.
हा निर्णय देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. यामुळे रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या 12 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठी भेट मिळाली आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता 46 टक्के एवढा महागाई भत्ता मिळणार आहे.
या संबंधित नोकरदार वर्गाला आतापर्यंत 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत होता. परंतु यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. यामुळे आता या संबंधित लोकांचा महागाई भत्ता 46% एवढा झाला आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असून याचा रोखीने लाभ पुढील महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे.
यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम सणासुदीच्या काळात मिळणार आहे. यामुळे दिवाळी सणाला या संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. रेल्वे बोर्डाने 23 ऑक्टोबर 2023 हा निर्णय घेतला असून या निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.
खरंतर केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. दरम्यान केंद्राने घेतलेल्या या निर्णयानंतर रेल्वे बोर्डाने देखील रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयानंतर आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 27 हजार रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे.
किती वाढणार पगार ?
समजा जर रेल्वे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56 हजार 900 रुपये एवढे असेल तर अशा कर्मचाऱ्याला आता 46 टक्के दरानुसार 26174 रुपये एवढ्या महागाई भत्ता मिळणार आहे. सदर कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे आतापर्यंत 23 हजार 898 रुपये एवढा महागाई भत्ता मिळत होता.
म्हणजेच त्यांच्या पगारात आता दरमहा 2276 रुपयांची वाढ झाली आहे. अशा तऱ्हेने वार्षिक आधारावर विचार केला तर 56 हजार 900 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याच्या पगारात आता 27,312 रुपये एवढी वाढ होणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता केव्हा वाढणार ?
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता केव्हा वाढणार हा प्रश्न महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट मध्ये दिवाळीपूर्वीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना खरंच दिवाळीपूर्वी हा लाभ मिळतो का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.