ब्रेकिंग ! RBI ची महाराष्ट्रातील ‘या’ दोन बँकांवर कडक कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआय ऍक्शनमध्ये, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : RBI अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील भारत सरकारने स्थापित केलेली मध्यवर्ती बँक आणि बँकिंग नियामक संस्था आहे. ही संस्था देशभरातील बँकांवर आपला कमांड ठेवते. आरबीआयच्या माध्यमातून देशभरातील बँकांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत.

या नियमांचे बँकांना काटेकोरपणे पालन करावे लागते. देशातील बँका या नियमांचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई देखील आरबीआय कडून केली जाते. अनेक प्रसंगी आरबीआय नियमांचे पालन न करणाऱ्या बँकेचा परवाना देखील रद्द करते. गेल्या दोन-तीन महिन्यांच्या काळात आरबीआयकडून असेच काही कठोर निर्णय घेतले गेले आहेत.

यामध्ये काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काही बँकेचा परवाना आरबीआयने कायमचा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या बँकेतील ग्राहकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अशातच आता महाराष्ट्रातील दोन बँकांवर पुन्हा एकदा आरबीआयच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील पुण्याच्या पिंपरी येथील इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँक आणि मुंबई येथील एसव्हीसी को-ऑपरेटिव बँक या दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कार्यवाही केली आहे. इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँकेला 3 लाख तर एसव्हीसी को-ऑपरेटिव बँकेला 13 लाख 30 हजाराचा दंड ठोठावण्याचा निर्णय आरबीआयकडून नुकताच घेण्यात आला आहे.

RBI ने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, मुंबई येथील एसव्हीसी को-ऑपरेटिव बँक ने येऊ का त्यांच्या देखरेखी संदर्भात असलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे तर पिंपरी येथील इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँकेने उत्पन्न ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण, विविध तरतूद आणि इतर काही बाबींचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान रिझर्व बँक ऑफ इंडियाने केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे बँकेतील ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे सांगितले जात आहे.

Leave a Comment