यंदा कमी पाण्यात तयार होणाऱ्या गव्हाच्या ‘या’ वाणाची पेरणी करा; विक्रमी उत्पादन मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : यावर्षी मान्सून काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस बरसला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यंदा सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची नोंद झाली आहे. आकडेवारीचा विचार केला असता हे प्रमाण फारसे वाटत नाही. मात्र पाण्याचे असमान वितरण पाहता काही भागात अक्षरशः दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

यामुळे यंदाच्या खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. शिवाय कमी पावसामुळे यंदाचा रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे. रब्बीत आपल्याकडे गहू आणि हरभरा या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा मात्र पाऊसमान कमी असल्याने गहू लागवडीखालील क्षेत्र कमी होणार असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे त्यांना देखील यावर्षी गहू पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यंदा कमी पाण्यात तयार होणाऱ्या गव्हाच्या वाणाची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कमी पाण्यात चांगली उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या वाणाची पेरणी केली तर शेतकऱ्यांना यंदाही चांगले उत्पादन मिळेल असे तज्ञांनी सांगितले आहे. यामुळे आज आपण कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या, जिरायती आणि कोरडवाहू भागात तग धरणाऱ्या गव्हाच्या प्रमुख जातीची माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या गव्हाची लागवड ठरणार फायदेशीर

कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा पाऊस मान कमी आहे यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाच्या पंचवटी, शरद आणि नेत्रावती यांसारख्या जिरायती वाणाची पेरणी केली पाहिजे. जिरायती भागात हे वाण खूपच फायदेशीर ठरते यामुळे या जातीची यंदा शेतकऱ्यांनी पेरणी केली तर त्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.

पंचवटी : या जातीला एन आय डी डब्ल्यू-१५ म्हणून ओळखले जात आहे. हा महाराष्ट्रात पेरणीसाठी शिफारशीत वाण आहे. हा वाण जिरायती भागासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शरद : हा देखील गव्हाचा एक प्रमुख वाण आहे. महाराष्ट्र राज्यासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. जिरायती भागासाठी हा वाण फायदेशीर ठरतो. जिरायती पेरणीसाठी उपयुक्त या जातीची ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी केली पाहिजे. हेक्टरी 75 ते 100 किलो पर्यंतचे बियाणे वापरले पाहिजे.

नेत्रावती : यंदा पाऊसमान कमी असल्याने नेत्रावती या वाणाची पेरणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या जातीसाठी महाराष्ट्रातील हवामान विशेष पूरक आहे. या जातीची पेरणी ही ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Comment