हवामानात अचानक आला मोठा चेंज; ‘या’ भागात बरसणार पुढील चार दिवस मुसळधार पाऊस ! हवामान खात्याचा नवीन अंदाज, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj 2023 : सध्या देशातील काही भागात ऑक्टोबर हीटचा प्रकोप पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी आता थंडीची चाहूल देखील लागली आहे. सकाळच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली असून यामुळे थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. काही ठिकाणी धुक्यांची दाट चादर पसरत आहे.

यामुळे आता आगामी काही दिवसात थंडीची तीव्रता वाढेल हे स्पष्ट होत आहे. अशातच देशावर दोन चक्रीवादळाचे सावट पाहायला मिळत आहे. एकीकडे अरबी समुद्रात तेज नावाचे चक्रीवादळ सक्रीय झाले आहे तर दुसरीकडे बंगालच्या खाडीत हमून नावाच्या चक्रीवादळाने अकराळ-विक्राळ रूप धारण केले आहे.

दरम्यान तेज चक्रीवादळामुळे देशातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने तेज चक्रीवादळाबाबत एक नवीन अपडेट दिले आहे. यानुसार देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असे सांगितले जात आहे. तसेच तेज चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर देखील काही परिणाम होणार का याबाबतही सुधारित हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तेज चक्रीवादळामुळे या भागात कोसळणार मुसळधार पाऊस

या चक्रीवादळामुळे केरळमध्ये आगामी चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे अनेक भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागातही पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच हे चक्रीवादळ आज अर्थातच 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD ने आज ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यात मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा राज्याचा समावेश होतो.

या राज्यांमध्ये आज हलक्या पावसाच्या सऱ्या बरसतील असे सांगितले जात आहे. याशिवाय, आज पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुद्धा पाऊस हजेरी लावू शकतो असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात कसे राहणार हवामान ? 

महाराष्ट्रात आगामी पाच दिवस कसे हवामान राहणार याबाबत आयएमडीने महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील तसेच राज्यातील विविध भागात ऑक्टोबर हिटचा प्रकोप कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा राज्यावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. मात्र राज्यातील काही भागात आगामी काही दिवस ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तसेच काही भागात उष्णता वाढणार आहे. याशिवाय राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडीची तीव्रता वाढणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment