हवामानात अचानक झाला मोठा बदल ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस, IMD चा अंदाज काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्यात मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाल्याची घोषणा केली होती. 25 सप्टेंबर पासून राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मान्सून राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून मान्सून माघारी फिरला आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील जवळपास 45 टक्के भागातून मान्सून माघारी फिरला आहे. खरंतर या वर्षी महाराष्ट्रात मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. राज्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत 96% पाऊस झाला आहे. निश्चितच सरासरीच्या तुलनेत पावसाची ही तूट आकडेवारीत कमी दिसत आहे. पण पावसाच्या असमान वितरणामुळे काही ठिकाणी खूप जास्त पाऊस आणि काही ठिकाणी खूपच कमी पाऊस पडला असल्याने निसर्गाचा हा लहरीपणा यंदाच्या खरीप हंगामासाठी मारक ठरला आहे. पावसाच्या या असमान वितरणामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस मका यांसारख्या सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात घट येणार आहे. अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्रातून मान्सून माघारी जात असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत मुंबई पुणे नागपूर सह महाराष्ट्रातील 45 टक्के भागातून मान्सून माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे त्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी जाणार आहे. अशातच हवामान खात्याने आगामी तीन दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD ने सांगितल्याप्रमाणे, पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात या कालावधीमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते, मात्र प्रामुख्याने हवामान कोरडे राहील आणि आकाश निरभ्र राहील असे सांगितले जात आहे.

Leave a Comment