देशातील पहिली बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून धावणार ! सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्यातून जाणार, कसा असेल रूट ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Bullet Train Project : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने देशातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. देशात विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. वंदे भारत ट्रेन सारख्या हायस्पीड ट्रेन चालवल्या जात आहे. पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.

यासोबतच बुलेट ट्रेन देखील चालवली जाणार आहे. देशातील एकूण सात महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन चालवल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देखील समावेश होतो. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विशेष म्हणजे हा देशातील पहिलाच बुलेट ट्रेन प्रकल्प आहे.

सध्या स्थितीला या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून हा प्रकल्प तयार केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरात साठी महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. खरंतर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे.

तसेच अहमदाबाद हे गुजरात मधील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबई आणि अहमदाबाद या दोन्ही शहरा दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. अशा स्थितीत या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्य परस्परांना बुलेट ट्रेनने जोडली जावीत यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पांतर्गत गुजरातमधील वलसाड येथील बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये पहिला माउंटन बोगदा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा माउंटन बोगदा फक्त दहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दोन ट्रॅक टाकले जाणार आहेत.

कसा आहे हा बोगदा 

हा बोगदा वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील जरोली गावापासून जवळपास 1 किलोमीटर दूर तयार करण्यात आला आहे. या बोगद्याची एकूण लांबी 350 मीटर इतकी आहे. तसेच हा टनेल 12.6 मीटर रुंदी आणि 10.25 मीटर उंच आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पांतर्गत या बोगद्याप्रमाणे एकूण सात बोगदे तयार केले जाणार आहेत. तसेच ठाणे ते मुंबई दरम्यान समुद्राखालून देखील एक बोगदा तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा देशातील पहिलाच समुद्र खालील बोगदा राहणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद प्रवास होणार काही मिनिटात

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे या दोन्ही शहरादरम्यानचे अंतर दोन तास आणि सात मिनिटात पूर्ण होणार आहे. यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होणार आहे. प्रकल्पासाठी एकूण 1.08 लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

सध्या या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून विक्रमी कालावधीमध्ये या प्रकल्पाचा पहिला माउंटेन बोगदा तयार करण्यात आला आहे. 

Leave a Comment