बळीराजाची यंदाची दिवाळी होणार गोड ! राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 378 कोटी रुपये, कोणाला मिळणार लाभ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture News : दिवाळीचा सण मात्र तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गोवत्सद्वादशीच्या दिवसापासून अर्थातच वसुबारसापासून सालाबादाप्रमाणे याहीवर्षी दिवाळीला सुरुवात होणार आहे. यंदा गोवत्स द्वादशी 9 नोव्हेंबरला राहणार आहे. यंदा दिवाळी नऊ नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान साजरी केली जाणार आहे.

यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण सोन्यासारखा सण उंबरठ्यावर आला असतानाही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठी चिंता पाहायाला मिळत आहे. यंदाच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला आहे.

म्हणून सोयाबीन, कापूस समवेत सर्व पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे, यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत. दरम्यान राज्यातील दुष्काळामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

ही बातमी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की, जिल्ह्यातील पिक विमा काढलेल्या केळी उत्पादकांना आता पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील 53 हजार 951 केळी बागायतदार शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम येत्या आठवड्याभरात दिली जाणार आहे.

खासदार उन्मेश पाटील यांनीच याबाबत माहिती दिली अशी. खासदार महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील 53 हजार 951 शेतकरी केळी फळ पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई साठी पात्र ठरले आहेत.

तसेच यासंबंधीत शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई म्हणून 378 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती खासदार महोदयांनी यावेळी दिली आहे. खरंतर दरवर्षी हवामानावर आधारित फळ पीक विम्याची रक्कम सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असते.

यंदा देखील या मुदतीतच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र पीक विमा कंपन्यांनी केळी लागवड क्षेत्राबाबत आक्षेप घेतला होता. विमा कंपन्यांनी केळी लागवड क्षेत्राची पडताळणी करण्याची मागणी केली होती.

यामुळे यावर्षी मुदतीत शेतकऱ्यांना केळीच्या पिक विम्याची रक्कम मिळू शकली नाही. पण आता केळी लागवड क्षेत्राची पडताळणी पूर्ण झाली असून जिल्ह्यातील 77 हजार 832 पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी 53 हजार 951 शेतकरी फळ पिक विम्यासाठी पात्र ठरले आहेत.

यामुळे आता या संबंधित शेतकऱ्यांना 378 कोटी 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तसेच ही रक्कम येत्या आठवड्याभरातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे देखील सांगितले जात आहे. 

Leave a Comment