ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ 40 तालुक्यात जाहीर होणार दुष्काळ, शेतकऱ्यांना मिळणार भरीव नुकसान भरपाई, तुमचा तालुका आहे कां यादीत ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. दुष्काळामुळे या संबंधित भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनता चिंतेत आली आहे. या भागातील काही तालुक्यांमध्ये परिस्थिती एवढी बिकट आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसात उंबरठ्यावर येण्याची शक्यता आहे.

परिणामी नागरिकांमध्ये आतापासूनच भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरतर यंदा जून महिन्यात माणसं उशिराने आला. मान्सूनचे राज्यातील तळ कोकणात आगमन झाले आणि बरेच दिवस तिथेच मुक्कामाला राहिला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला. त्यामुळे जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची हजेरी लागली.

यानंतर जुलै महिन्यात पात्र राज्यातील बहुतांशी भागांमध्ये चांगला पाऊस झाला. पण काही ठिकाणी तर जुलै महिन्यात सुद्धा पाऊस पडला नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले आहे. शिवाय ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडला. सर्वत्र दुष्काळाची झळ बसली.

सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही भागात मात्र पुन्हा एकदा पाऊस पडला. यामुळे राज्यातील काही भागातील शेती पिकांना दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी शेती पीके पावसाअभावी करपली आहेत. दरम्यान राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने 42 तालुके अवर्षणग्रस्त म्हणून ठरवले होते. पण यापैकी 40 तालुके हे दुष्काळ जाहीर करण्यासाठी अंतिम करण्यात आले आहेत.

येत्या दोन दिवसात या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या तुलनेत 12% कमी पाऊस पडला आहे. केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे यावर्षी राज्यातील 42 तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती तयार झाली आहे.

खरंतर याआधी राज्यातील 194 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे सर्वेक्षण करण्यात आली होते. परंतु केंद्र शासनाने ठरवलेल्या निकषानुसार जेव्हा ट्रिगर दोन मधील माहिती भरण्यात आली तेव्हा राज्यातील केवळ 42 तालुके यामध्ये पात्र ठरले आहेत. यानुसार आता या संबंधित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होणार आहे. आता आपण राज्यातील कोणत्या तालुक्यात दुष्काळ जाहीर होईल याविषयी जाणून घेऊया.

या तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार

हाती आलेल्या माहितीनुसार, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, सोयगाव, जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर, अंबाजोगाई, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, धाराशिव वाशी, धाराशिव, लोहारा, खान्देश विभागातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील शिदखेडा, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, बुलढाणा बुलढाणा, लोणार, मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर, येवला, पुणे जिल्ह्यातील शिरूर, मुळशी, पॉड, दौंड, पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, सातारा वाई, खंडाळा, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज, सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.

Leave a Comment