महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोने पे सुहागा ! दिवाळीआधी सरकार देणार 4 हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ ? 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer Scheme : आज विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. आज नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. मात्र सणासुदीचा हंगाम आज पूर्णपणे संपेल असे नाही. कारण की येत्या महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे.

या सणासुदीच्या काळातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारकडून चार हजार रुपये मिळणार आहेत. दिवाळीच्या पूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वितरित केली जाणार आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.

या नमो शेतकरीच्या पहिल्या हप्त्याला नुकतीच राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. पहिल्या हफ्त्यासाठी 1,720 कोटीला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान हा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

शिर्डी येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरीचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासोबतच पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच पंधरावा हप्ता देखील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. हा पंधरावा हप्ता सुद्धा पात्र शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वीच वितरित होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

यामुळे पीएम किसानसाठी आणि नमो किसानसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये दिवाळीच्यापूर्वी दिले जाणार आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य शासनाने दिवाळीच्या पूर्वीच या दोन्ही योजनेअंतर्गत चार हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिलेत तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असे सांगितले जात आहे.

पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख 60 हजार 546 शेतकरी पात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील या जवळपास पावणेचार लाख शेतकऱ्यांना आता लवकरच चार हजार रुपयाची भेट मिळणार असल्याने जिल्ह्यातील या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Leave a Comment