Maharashtra Expressway Latest Update : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एकात्मिक प्रयत्न केले जात आहेत. यात राज्यातील रस्ते वाहतूक मजबूत करण्यासाठी विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. खरंतर, कोणत्याही विकसित राष्ट्रात, प्रदेशात, राज्यात तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते.
हेच कारण आहे की आता शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांमध्ये नवीन महामार्गाची उभारणी केली जात आहे. या नवीन महामार्गाच्या उभारणीतून शासन शहरा शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात एका नवीन महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे.
राजधानी मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान नवीन महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. खरंतर मुंबईमध्ये कोकणातील चाकरमाने मोठ्या प्रमाणात कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. अशा स्थितीत कोकणातून मुंबईला आणि मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे.
दररोज मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. अशा स्थितीत मुंबई ते कोकणाचा प्रवास सुपरफास्ट व्हावा म्हणून मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान ग्रीन फील्ड महामार्ग विकसित केला जात आहे. या महामार्गाला मुंबई सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग म्हणून ओळखले जाणार आहे.
दरम्यान या महामार्गाच्या कामाला आता गती मिळणार असल्याचे चित्र आहे. कारण की महाराष्ट्र राज्य शासनाने मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड महामार्गासाठी 100 मीटर रुंदीची जमीन संपादित करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या मार्गासाठी लवकरच भूसंपादनाचे काम सुरू होईल आणि भूसंपादनानंतर लवकरच या मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू केले जाईल असा आशावाद व्यक्त केला जाऊ लागला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली घोषणा
खरंतर या महामार्गाची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहे. महाराष्ट्र राज्य शासनातील तत्कालीन नगर विकास मंत्री आणि वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाची घोषणा केली होती. गेल्या वर्षी अर्थातच 2022 मध्ये या मार्गाची घोषणा झाली आणि आता सप्टेंबर 2023 मध्ये या मार्गासाठी भूसंपादन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता या मार्गाचे लवकरच भूसंपादन होणारा असे सांगितले जात आहे.
कसा असणार मार्ग?
हा महामार्ग कोकण किनारपट्टी लगत विकसित केला जाणार असून याची लांबी 388.45 किलोमीटर एवढी राहणार आहे. हा सहा लेनचा म्हणजेच सहा पदरी महामार्ग राहील. हा मार्ग मुंबई मधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट कनेक्ट होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. हा मार्ग मुंबई रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे.