शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! शेततळ्यासाठी असणारी लॉटरी पद्धत बंद, आता सर्वच शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळणार, ‘ही’ कागदपत्रे जोडावी लागणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी मागेल त्याला शेततळे योजने संदर्भात आहे. खरंतर राज्यातील निम्म्याहुन अधिक शेतीचे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पडीक पडून राहतात.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे त्या फळबागावर देखील उन्हाळ्यात पाण्याअभावी विपरीत परिणाम होतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येते. पाणी हे शेतीसाठी आवश्यक आहे पाण्याविना शेती होऊच शकत नाही. म्हणून शेतीसाठी शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यात शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदान दिले जात आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अनुदान पुरवले जात आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड होत असे. मात्र आता ही पद्धत कालबाह्य होणार आहे. लॉटरी पद्धतीमुळे अनेक गरजू शेतकरी देखील शेततळ्यापासून वंचित राहत होते.

अशा परिस्थितीत ही लॉटरी पद्धत बंद करून आता सर्वच गरजू शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अनुदान देण्याचा महत्त्वाचा असा निर्णय शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्याच पुढाकारातून शेततळ्यासाठी असणारी लॉटरी पद्धत बंद झाली असून आता जे पात्र शेतकरी शेततळ्यासाठी अर्ज करतील त्या सर्वांनाच अनुदान दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

वास्तविक, ही योजना शाश्वत पाण्याची सोय व्हावी यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्या भागात पावसाचे पाण्याचे प्रमाण कमी असते अशा भागात शेततळ्याचे महत्त्व वाढते. पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठवून याचा वापर रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी होतो.

ज्या ठिकाणी विहिरींना चांगले पाणी नसते त्या भागात शेततळ्यांचा अधिक उपयोग होतो. शेततळ्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुपटीने वाढ होण्यास मदत झाली आहे यात शंकाच नाही. मात्र अशी ही कल्याणकारी योजना कोरोना काळात बंद करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षे ही योजना बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला असता वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला. ही योजना पुन्हा एकदा राज्यात सुरू झाली असून या अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे अस्तरीकरण करण्यासाठी 75,000 पर्यंतचे अनुदान दिले जात आहे.

या योजनेचा लाभ त्यांच शेतकऱ्यांना मिळणार ज्यांच्या नावे किमान ६० गुंठे जमीन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक असून शेततळे मंजूर झाल्यानंतर तीन महिन्याच्या काळात काम पूर्ण करणे आवश्यक आहे. वैयक्तिक शेततळ्यासाठी आठ प्रकार पडतात आणि आकारमानानुसार 20,000 पासून ते 75000 पर्यंतचे अनुदान शेततळ्यासाठी दिले जात आहे.

आता यासाठी लॉटरी पद्धत बंद करण्यात आली असून जे शेतकरी अर्ज करतील त्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आता शेततळे मिळणार अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली आहे.

शेततळ्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शेततळ्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यात जमिनीचा सात-बारा उतारा लागतो. लाभधारक शेतकऱ्याचे आधारकार्ड, बॅंक पासबुक आणि हमीपत्राचेही बंधन, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला यांसारखी काही अन्य महत्वाची कागदपत्रे देखील जोडावी लागतात. 

Leave a Comment