शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पिक विमा योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणांस ठाऊकच आहे की, राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली असून ही योजना पुढील तीन वर्षांसाठी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून सुरू देखील झाली आहे. या अंतर्गत रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. खरीपातील जवळपास 15 पिकांना हे विमा संरक्षण लागू राहणार आहे. वास्तविक, या चालू खरीप हंगामातील पिकांसाठी पिक विमा काढण्यासाठी अर्ज भरण्यास 31 जुलै 2023 पर्यंत म्हणजेच कालपर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र या विहित मुदतीत शेतकऱ्यांना अर्ज सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पंतप्रधान फसल बीमा योजनेचे अधिकृत संकेतस्थळ हँग होत असल्याने अनेकांना अर्ज सादर करता आला नाही. तर काही सीएससी केंद्रांकडून पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी अधिकच्या पैशांची मागणी केली जात असल्याने शेतकरी हा अर्ज भरण्यास उत्सुक नव्हते.

वास्तविक सीएससी सेंटर चालकाला हा अर्ज भरण्यासाठी प्रति अर्ज 40 रुपये प्रमाणे संबंधित पिक विमा कंपनीकडून पैसे दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना केवळ सीएससी सेंटर चालकाला एक रुपया द्यायचा आहे आणि एक रुपयात पिक विमा योजनेचा अर्ज भरायचा आहे.

मात्र सीएससी सेंटरवर शेतकऱ्यांची लूट केली जात होती. दरम्यान शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवण्यासाठी कृषी आयुक्तांनी जे सीएससी सेंटर चालक अधिकचे पैसे आकारतील त्यांचा थेट परवाना रद्द करा असे आदेश निर्देश निर्गमित केले होते. यानंतर राज्यात अशा घटना उघडकीस आल्या नाहीत. मात्र यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत अर्ज सादर करता आले नाहीत.

अशा परिस्थितीत एक रुपयात पिक विमा योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. याच मागणीला अनुसरून राज्याचे नवोदित कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार कृषी विभागाने केंद्राकडे पिक विमा योजनेस अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. दरम्यान राज्याच्या कृषी विभागाची ही मागणी केंद्राने मान्य केली असून आता पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यास तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

यानुसार आता तीन ऑगस्ट 2023 पर्यंत पिक विमा योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे आता एक रुपयात पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना तीन ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Leave a Comment