ऑगस्ट महिन्यात राज्यातून पाऊस गायब होणार ! सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहणार ? 2 महिन्याचा पावसाचा अंदाज वाचा 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पाहायला मिळाली. जून महिन्यात राज्यात खूपच कमी पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 17 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट देखील भरून निघाली.

जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. यामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

हवामान विभागाच्या माध्यमातून आगामी दोन महिने अर्धातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात हवामान कसं राहणार? पाऊस पडणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असा अंदाज आहे.

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पाऊस होणार असा अंदाज आहे. मात्र त्यानंतर राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे. विशेष बाब म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार ?

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागात जोरदार सऱ्या बरसणार असा अंदाज आहे. दोन ते चार ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ऑगस्ट चा पहिला आठवडा वगळला तर संपूर्ण महिना राज्यात पाऊसमान कमीच राहणार असा अंदाज आहे.

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार, 3 ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. विशेष बाब अशी की, पुढील पाचही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. परंतु पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे.

तसेच 4 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. एकंदरीत ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा वगळला तर राज्यात पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निश्चितच, मान्सून बाबतचा हा अंदाज शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा सिद्ध होऊ शकतो.

Leave a Comment