Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याची सुरुवात जरुर अवकाळी पावसाने झाली. या चालू महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी गारपिट देखील झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे.
मात्र, आता गेल्या 8-9 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढू लागले आहे. काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 38 ते 40°c पर्यंत पोहोचले आहे. अशातच मात्र राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट तयार होत असल्याचा अंदाज समोर आला आहे.
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग बाकी आहे अशा शेतकऱ्यांची चिंता वाढणार हे स्पष्ट होत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासांमध्ये राज्यातील काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आगामी दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या नवीन बुलेटिन मध्ये वर्तवण्यात आला आहे.
आता आपण हवामान खात्याने विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
काय म्हणतंय IMD
इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान विभागाने नुकताच एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. यामध्ये आयएमडीने सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत असल्याचे नमूद केले आहे.
विशेष म्हणजे या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होणार अशी शक्यता असल्याने याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावरही जाणवणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
दरम्यान याच संदर्भात हवामान खात्याने माहिती दिली असून याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवेल असा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
IMD ने 16 ते 18 मार्च 2024 पर्यंतच्या कालावधीत राज्यातील विदर्भ विभागातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
खान्देशात सुद्धा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने यावेळी वर्तवला आहे. एवढेच नाही तर हवामान विभागाने विदर्भाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा यावेळी दिला आहे.