Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
10 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. 14 फेब्रुवारी पर्यंत मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घासिरावला गेला.
अशातच आता राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी तीन दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
मात्र त्यानंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 25 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
25 फेब्रुवारीला अर्थातच रविवारी राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
IMD म्हणतंय की, राज्यातील हवामान पुढील तीन दिवस कोरडे राहील. म्हणजेच 24 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नाही.
पण, रविवारी राज्यातील विदर्भ विभागातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल असा अंदाज आहे.
यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील यासंबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
याशिवाय ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील 26, 27 आणि 28 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.