Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. जवळपास 15 ते 16 दिवसांच्या मोठ्या विश्रांतीनंतर आता पावसाने रिएंट्री घेतली आहे. पावसाचा कमबॅक झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

मात्र राज्यातील काही मोजक्याच परिसरात सध्या तुरळक पाऊस पडत आहे. अजूनही राज्यात जोरदार पाऊस झालेला नाही. शिवाय सध्या पडणारा हा हलका पाऊस राज्यात सर्व दूर पडत नसून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पडत आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा खंड अजूनही कायमच आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत.

Advertisement

जोरदार पाऊस केव्हा पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. अशातच राज्यातील हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रासाठी पुढील चार तास अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत. येत्या चार तासात राज्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर तुरळक ठिकाणी तीव्र सऱ्या बरसतील असा अंदाज आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ हवामानातज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली की, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येत्या काही तासात या विभागांमध्ये काही ठिकाणी अधूनमधून तीव्र सरी पडण्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.

Advertisement

खरतर गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भाला पावसाची आतुरता होती. आता गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही विभागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.

शिवाय पुढील तीन-चार तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस या दोन्ही विभागात पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तीव्र पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार अस सांगितलं जात आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *