महाराष्ट्रात पुढील सात दिवस जोरदार पाऊस होणार ! कोणत्या भागात बरसणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Monsoon News : महाराष्ट्रात तब्बल एका महिन्याच्या सुट्टीनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपत असलेल्या पिकांना आता पुन्हा एकदा जीवनदान मिळेल अशी भोळी भाबडी आशा पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

राज्यात ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर गेलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कमबॅक केले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून अंशतः सक्रिय झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, पालघर सह राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.

प्रामुख्याने पावसाचा जोर पुण्यात सर्वाधिक पाहायला मिळाला. पुण्यातील लोणावळा आणि घाट परिसरात जोरदार पावसाची हजेरी लागली. अनेक भागात तर अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळाले आहे.

अशातच हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात आगामी सात दिवस कसं हवामान राहणार याबाबत पुणे वेधशाळेने ही माहिती दिली आहे. पुणे वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे 4 सप्टेंबर नंतर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

आज मात्र कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित भागांसाठी आज हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे आय एम डी ने पुढील पाच ते सात दिवस पुणे व आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

तसेच येत्या दोन दिवसात पुणे घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल तसेच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल असे नमूद केले आहे.

मात्र असे असले तरी सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची आशा आहे.

जून आणि ऑगस्ट महिन्यात खूपच कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जर चांगला पाऊस पडला तर रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी उपलब्ध राहील आणि या हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई आगामी हंगामातून भरून काढता येईल असे शेतकरी सांगत आहेत.

Leave a Comment