शेतकऱ्यांचे अच्छे दिन सुरु; कांदा बाजारभाव 4 हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात, राज्यातील ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे ती कांदा बाजारातून. वास्तविक गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोसहित सर्वच भाजीपाला पिकाचे दर वाढले आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.

टोमॅटो विक्रीतून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. काही शेतकऱ्यांना तर करोडोची कमाई झाली आहे. अशातच आता राज्यातील कांदा उत्पादकांना देखील दिलासा मिळू लागला आहे. कांद्याच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.

विशेष म्हणजे कालच्या लिलावात राज्यातील काही बाजारात कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक भाव मिळाला आहे. तर राज्यातील एका महत्वाच्या बाजारात कांद्याला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या क्रिसिल रिपोर्ट मध्ये पुढच्या महिन्यात कांद्याचे दर किरकोळ बाजारात 55 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचणार असा दावा करण्यात आला आहे. अशातच मात्र कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

शासनाने बफर स्टॉक मधील तीन लाख मेट्रिक टन कांदा ज्या राज्यांमध्ये कांद्याला अधिक भाव मिळत आहे त्या राज्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांद्याच्या किमती नियंत्रणात येतील आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे.

पण शासनाचा हा निर्णय देशभरातील कांदा उत्पादकांना धक्का देणारा आहे. यामुळे आता शासनाच्या या निर्णयामुळे आगामी काळात कांद्याचे भाव खरच पडतात का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी दर

काल अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजारात कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. कालच्या लिलावात जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी 3500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे.

या एपीएमसी मध्ये काल दहा हजार 228 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती आणि लिलावात आलेल्या कांद्याला किमान तीनशे रुपये, कमाल 3500 रुपये आणि सरासरी 1850 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला. तसेच श्रीरामपूर एपीएमसी मध्येही काल कांद्याला 3100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 2350 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.

याव्यतिरिक्त कोपरगाव एपीएमसी मध्ये देखील काल उन्हाळी कांद्याला कमाल 2600 आणि सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला आहे. एकंदरीत कालच्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी बाजारात उन्हाळी कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.

Leave a Comment