रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! 30 आणि 31 ऑगस्टला महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस गाड्या राहणार रद्द, प्रवासाला निघण्यापूर्वी एकदा वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. दररोज रेल्वेने हजारो प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा आणि गतिमान तसेच सुरक्षित असल्याने या प्रवासाला कायमच मध्यमवर्गीयांनी पसंती दाखवली आहे.

दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 30 आणि 31 ऑगस्टला महाराष्ट्रातून धावणाऱ्या काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यामुळे जर तुम्हीही या चालू महिनाअखेर रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन केला असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मृतिजापूर या ठिकाणी अभियांत्रिकी कामासाठी 30 आणि 31 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर धावणाऱ्या तब्बल 14 एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन रद्द करण्याचा मोठा निर्णय देखील यावेळी मध्य रेल्वेने घेतला आहे. एवढेच नाही तर 29 ऑगस्ट रोजी धावणाऱ्या काही गाड्या देखील रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण मध्य रेल्वेने घेतलेल्या या मेगा ब्लॉकमुळे 29, 30 आणि 31 ऑगस्ट रोजी कोणत्या पॅसेंजर आणि कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द राहणार आहेत याविषयी थोडक्यात पण सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

30 ऑगस्टला कोणत्या गाड्या रद्द होणार?

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर 17641 काचिगुडा-नरखेड एक्स्प्रेस (30ऑगस्ट),

01128 बल्लारशाह- एल टी टी विशेष एक्स्प्रेस

11121 भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस

22117 पुणे-अमरावती एक्स्प्रेस

12111 सी एस टी टर्मिनस-अमरावती एक्स्प्रेस

12112 अमरावती- सी एस टर्मिनस एक्स्प्रेस

12136 नागपूर-पुणे एक्स्प्रेस

31 ऑगस्टला कोणत्या गाड्या रद्द राहणार?

17642 नरखेड-काचिगुडा एक्स्प्रेस 

11122 वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस

22118 अमरावती-पुणे एक्स्प्रेस

01365 भुसावळ-बडनेरा पॅसेंजर

01366 बडनेरा-भुसावळ पॅसेंजर

12135 पुणे-नागपूर एक्स्प्रेस

29 ऑगस्टला कोणती एक्सप्रेस गाडी रद्द राहणार

रेल्वे क्रमांक 01127 एलटीटी -बल्लारशाह विशेष एक्स्प्रेस ही एकमेव गाडी 29 ऑगस्ट रोजी रद्द करण्याचा मोठा निर्णय मध्ये रेल्वेने घेतला आहे.

Leave a Comment