महाराष्ट्रात पावसाचा जोर केव्हा वाढणार, ऑगस्टच्या सरते शेवटी मुसळधार पडणार का ? पुणे वेधशाळेने स्पष्टच सांगितले 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj Pune Weather Department : या चालू ऑगस्ट महिन्यात सुरुवातीचे तीन ते चार दिवस रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. यानंतर पावसाने उघडीप घेतली. राज्यात तब्बल पंधरा दिवसांहुन अधिक काळ महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहिले. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका, तूर इत्यादी पिकांना याचा मोठा फटका बसला.

अनेक भागातील पिके करपू लागली आहेत. पाण्याअभावी खरिपातील पिकांची राख-रांगोळी होत आहे. 18-19 ऑगस्टपासून राज्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पण राज्यात अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाहीये. खरीप हंगामातील पिकांसाठी आता मुसळधार पावसाची गरज आहे.

शिवाय राज्यातील धरणे अजूनही 100% क्षमतेने भरलेली नाहीत यामुळे धरणांचा पाण्याचा साठा वाढण्यासाठी मुसळधार पावसाची नितांत गरज आहे. यामुळे सध्या सर्वांच्या नजरा आभाळाकडे आहेत. बळीराजा मुसळधार पाऊस पडावा यासाठी देवाकडे साकडे घालत आहे.

अशातच पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात आता मुसळधार पाऊस केव्हा सुरू होईल याबाबत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस होणारच नाही.

म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील राहिलेल्या दिवसात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कुठे अधून-मधून रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र मोठा पाऊस या महिन्यात पडणार नाही असे सांगितले जात आहे. मात्र पुढचा महिना शेतकऱ्यांसाठी दिलासादायक राहू शकतो.

कारण की पुढल्या महिन्यात पुणे वेधशाळेने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र असे असले तरी प्रशांत महासागरात एल निनोचा प्रभाव आहे, यामुळे या एल निनोचा सप्टेंबरमधील पावसावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

दरम्यान हवामान खात्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी पुढील दहा दिवस शेततळ्यातील किंवा अन्य सोर्सेस मधून उपलब्ध पाण्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. याचा अर्थ आगामी दहा दिवस तरी राज्यात अपेक्षित असा पाऊस पडणार नाहीये. दहा दिवसानंतर मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

Leave a Comment