Maharashtra Rain : नोव्हेंबर महिना अवघ्या 10 दिवसात संपणार आहे. खरे तर नोव्हेंबर महिना सूरु झाला की गुलाबी थंडीला सुरुवात होत असते. महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात घट होते आणि जोरदार थंडीला सुरुवात होत असते.
यंदा मात्र महाराष्ट्रात अजूनही जोरदार थंडीची प्रतीक्षाच आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. पण तदनंतर कमाल आणि किमान तापमान आणखी वाढले आणि थंडी जणू काही गायबच झाली आहे.
राज्यात काही ठिकाणी अल्हाददायक थंडीची जाणीव होऊ लागली आहे. परंतु, म्हणावी तशी थंडी अजूनही कुठेच पाहायला मिळालेली नाही. यामुळे नागरिकांच्या माध्यमातून यंदा जोरदार थंडीला केव्हा सुरुवात होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसऱ्या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
या चक्रीवादळाला मिधिली अस नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे देशातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात मात्र या चक्रीवादळाचा प्रत्यक्ष कोणताच परिणाम होत नाहीये.
पण यामुळे उत्तरेकडील थंड वारे मध्य भारतापर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होत असल्याने महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये थंडीने अद्याप म्हणावा तसा जोर पकडलेला नाही.
म्हणून भारतीय हवामान विभागाने हे चक्रीवादळ जमिनीवर येऊन त्याचा प्रभाव कमी झाल्यावरच थंडीत वाढ होईल अशी माहिती दिली आहे.
एकीकडे थंडीचा जोर वाढत नाहीये तर दुसरीकडे हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागात या आठवड्याच्या शेवटी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
आयएमडीने सांगितल्याप्रमाणे, 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील हवामानात बदल होणार आहे. वातावरणातील बदलामुळे 25 नोव्हेंबरला नागपूरसहित विदर्भात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तर 26 नोव्हेंबरला नागपूर आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे संबंधित भागातील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊन आपल्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे.