शेतकऱ्यांच्या घामाला मिळालं योग्य मोल ! कापूस बाजारभावात झाली मोठी वाढ, मिळाला एवढा भाव, भाववाढ होणार का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, दिवाळीपूर्वी एम एस पी अर्थातच हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होणारा कापूस आता चांगलाच भाव खाऊ लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे.

भाववाढीमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान आहे. पण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासाठी आणि रब्बी हंगामासाठी पैशाची खूपच गरज होती. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री केली आहे.

पण ज्या शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी कापूस विकलाय त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. वास्तविक कापसाला पांढर सोनं म्हणून ओळखल जात. मात्र हे पीक गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी खूपच त्रासदायक ठरू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला होता.

याचा परिणाम म्हणून गेल्या हंगामात कापूस लागवड वाढली होती. मात्र गेल्या हंगामात कापसाला सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक दर मिळाल्यानंतर बाजार भाव दबावात आले होते. यंदा देखील हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजेच विजयादशमीच्या मुहूर्तावर कापसाला चांगला भाव मिळेल असे वाटत होते.

मात्र मुहूर्ताला देखील यंदा चांगला दर मिळाला नाही. यामुळे आगामी काळात बाजार भाव कसे राहणार हा मोठा सवाल होता. मुहूर्ताचा कालावधी उलटल्यानंतर कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळू लागला. दिवाळीपर्यंत जवळपास अशीच परिस्थिती होती.

काही ठिकाणी हमीभावापेक्षा थोडासा अधिक भाव कापसाला मिळत होता. पण आता दिवाळीनंतर परिस्थिती बदलू पहात आहे. नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी कापसाची पंढरी म्हणून ख्यातनाम असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल सात हजार 825 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

म्हणजेच अकोट मध्ये कापूस बाजार भाव आठ हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. लवकरच 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव वाढ होईल अशी भोळीभाबडी आशा आता शेतकऱ्यांना लागली आहे.

मात्र खुल्या बाजारात सर्वाधिक कापूस आपल्यालाच मिळावा या आशेने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला सुरुवातीलाच विक्रमी दर दिला असल्याचे जाणकार लोकांनी सांगितले आहे. यामुळे हे भाव पुढील काळात असेच कायम राहणार का हा मोठा सवाल आहे.

जाणकार लोकांनी पुढील काळात भाव असेच तेजीत राहतील का? याबाबत आत्ताच सांगणे थोडे कठीण असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, काल झालेल्या लिलावात हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाला हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळाला आहे.

या एपीएमसीमध्ये काल 3500 क्विंटल कापसाची आवक झाली होती. येथे कापूस किमान 7000, कमाल 7435 आणि सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल या दरात विकला गेला आहे.

Leave a Comment