Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. खरंतर गेल्या महिन्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली होती, यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील अनेक प्रमुख नद्यांना पुर आला होता.

राज्यातील अनेक महत्त्वाच्या धरणातुन धोका लक्षात घेता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा जोर ओसरला आहे. जवळपास सहा ते सात दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. यामुळे पूरस्थिती आता निवळली आहे. मात्र असे असले तरी राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.

Advertisement

आज देखील राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आता गेल्या एका आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. राज्यातील काही भागात हलक्या सरीही पडत आहेत. आज देखील राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

तर काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित भागाला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाच्या उघडीपसह, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आय एम डी ने वर्तवला आहे.

Advertisement

भारतीय हवामान विभाग अर्थातच आयएमडीने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार, आज राजधानी मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर तसेच दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात विशेषता घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *