आनंदाची बातमी ! नासिक ते ठाणे प्रवास होणार सुसाट, ‘या’ प्रकल्पाचे काम झाले पूर्ण, मंत्री उदय सामंत यांची मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik To Thane Travel News : पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक ते उत्तर कोकणातील ठाणे यादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. नासिक शहर एक एक महत्त्वाचे कृषी बाजारपेठ आहे आणि ठाणे हे देखील राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे.

या शहरादरम्यान प्रवास करताना मात्र नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. खरतर ठाणे-नासिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. म्हणून या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण व्हावीत त्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत. दरम्यान नासिक ते ठाणे दरम्यानचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी चौक येथील पुलाचे काम हाती घेण्यात आले होते.

या पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, ठाणे ते नाशिक रस्त्यावरील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी पाईपलाईन रस्त्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

उदय सामंत यांनी काल ही डागडुजी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती विधिमंडळात दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी पाहता भाजप आमदार निरंजन डावखेरे यांनी विधिमंडळात काल एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता.

डावखरे यांनी माजिवडा-वडपे दरम्यानच्या रस्त्याचे तीन वर्षांत केवळ 30 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील एका वर्षात 70 टक्के काम कसे पूर्ण होईल असा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला.

या प्रश्नावर उत्तर देताना मंत्रिमहोदयांनी ठाणे-बेलापूर दरम्यान विटावा पुलाखाली पावसाळ्यात पाणी साचते व वाहतूक कोंडी होत असल्याने ही वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी पुलाचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

यासाठी 333 कोटी रुपयांचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे सादर करण्यात आला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देखील यावेळी मंत्र्यांनी विधिमंडळाला दिली आहे. एवढेच नाही तर कोपरीच्या तिसऱ्या पुलासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात आला असल्याचे देखील यावेळी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहाला कळवले आहे.

तसेच ठाणे-भिवंडी दरम्यान लहान वाहनांसाठी पाइपलाइन मार्गाची दुरुस्ती जलद गतीने करण्यात येईल असे महत्त्वाचे आश्वासन देखील यावेळी विधिमंडळात मंत्री महोदय यांनी दिले आहे. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी ठाणे ते नाशिक दरम्यानच्या मार्गाची पाहणी केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी संबंधितांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यात पाईपलाईन रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरतर हा राष्ट्रीय महामार्ग आहे मात्र या महामार्गावर परस्पर यू-टर्नच्या जागा करण्यात आल्या आहेत.

तसेच काही ठिकाणी स्वत:च्या जागेत पार्किंग करण्यासाठी दुभाजक फोडण्यात आले आहेत. जे की चुकीचे असून पूर्णपणे अवैध आहे. या अशा प्रकारामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी वाढत आहे. परिणामी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हे दुभाजक बंद करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.

याशिवाय ठाणे ते वडपे हा आठ पदरी रस्ता देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी संबंधितांना मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे शासनाच्या माध्यमातून ठाणे ते नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केले जात असलेले हे प्रयत्न निश्चितच दिलासादायक ठरणार असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Leave a Comment