शेतकऱ्यांनो सावधान ! उद्यापासून तीन दिवस राज्यातील ‘या’ भागात होणार अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : यावर्षी मान्सूनने जवळपास सहा दिवस पूर्वीच संपूर्ण भारत व्यापून घेतला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अर्थातच दोन जून रोजी नैऋत्य मान्सूनने संपूर्ण भारत देश व्यापला आहे. निश्चितच मान्सून सर्वत्र पोहोचला असल्याने मान्सूनचा जोर वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. खरंतर जून महिन्यात मान्सून महाराष्ट्रात आला.

नेहमीपेक्षा उशिराने दाखल झाला. मात्र मान्सून पोहोचल्यानंतर देखील राज्यातील बहुतांशी भागात जून महिना हा कोरडाच गेला. आता जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे मात्र तरीही अद्याप पावसाने जोर पकडलेला नाही. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी मात्र जोरदार पावसाची गरज आहे.

कोकणात आणि घाटमाथ्यावर जरूर पावसाचा जोर अधिक आहे मात्र उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून तीन दिवस राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. 

IMD ने सांगितलंय की, पाच ते सात जुलै दरम्यान राज्यातील कोकण विभागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच सहा ते सात जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता अधिक राहणार आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला अधिक सतर्क रहावे लागणार आहे.

IMD ने महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर पाच दिवसांपासून ढगांची प्रचंड गर्दी होत असून तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तिकडून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर दाखल होत असल्याची माहिती दिली आहे.

तसेच वातावरणातील या बदलामुळे कोकणात पावसाचा जोर जास्त असल्याचे स्पष्टीकरण यावेळी दिले आहे. तसेच कोकणात आणि घाटमाथ्यावर आणखी जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली असून 5 ते 7 जुलैदरम्यान कोकणात, तर 6 व 7 जुलै रोजी मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

Leave a Comment