महाराष्ट्राला लवकरच मिळणार 6वी वंदे भारत एक्सप्रेस ! ‘या’ मार्गावर धावणार, केव्हा सुरु होणार ? स्टॉपेज, रूट मॅप पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Vande Bharat Express : राज्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला लवकरच एका नवीन वंदे भारत एक्स्प्रेसची भेट मिळणार आहे. ही ट्रेन सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत राज्यात एकूण पाच वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत.

ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती आणि तेव्हापासून म्हणजेच या चार वर्षांच्या काळात संपूर्ण देशभरात 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. यापैकी पाच गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावत आहेत. तसेच आता आणखी एक गाडीची भेट महाराष्ट्राला मिळणार आहे.

म्हणजेच राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या लवकरच सहा एवढी होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रात धावणारी ही सहावी गाडी कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे, या गाडीचा रूट, थांबे अन ही गाडी केव्हा धावणार? याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या मार्गावर धावणार

मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर इतर एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. मात्र या ट्रेनला प्रवासासाठी अधिकचा वेळ खर्च करावा लागत आहे.

परिणामी या मार्गावरील प्रवासी रेल्वे मार्गे प्रवास करण्याऐवजी रस्ते मार्गाला पसंती दाखवतात.मुंबई ते कोल्हापूर अंतर रेल्वे मार्गाने ५१८ किलोमीटर असून या मार्गावर जर ही हायस्पीड ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास आधीपेक्षा अधिक गतिमान होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे.

कोणत्या स्थानकावर घेणार थांबा?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवासादरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

प्रवासाचा किती वेळ वाचणार?

सध्या या मार्गावर दोन एक्सप्रेस सुरू आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 11 ते 12 तासांचा कालावधी लागतो. पण जर या मार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. म्हणजे अवघ्या सात तासात ही गाडी या दोन शहरादरम्यानचा प्रवास पूर्ण करू शकणार आहे.

केव्हा सुरू होणार गाडी?

हाती आलेल्या माहितीनुसार, या मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही गाडी सुरू होणार आहे. सध्या हे काम योग्य पातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी शक्यता आहे. साधारणता नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असून नोव्हेंबर 2023 मध्ये या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन चालवली जाऊ शकते.

Leave a Comment