हवामानात मोठा चेंज, 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ‘या’ भागात धो-धो पाऊस बरसणार, भारतीय हवामान खात्याचा दिलासादायक अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे.

ऑक्टोबर हिटमुळे सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शिवाय जून आणि ऑगस्ट महिन्यात खूपच कमी पाऊस झाला असल्याने या मान्सून काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता मान्सून अंतिम टप्प्यात आला आहे.

येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. सध्या राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे मान्सून रेंगाळला आहे. पण येत्या काही दिवसात मान्सून परत जाणार आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे.

खरंतर गेल्या 24 तासात देशातील विविध भागात पावसाची हजेरी लागली. आपल्या महाराष्ट्रातही काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळाला. दरम्यान आता पुढील 24 तासात महाराष्ट्रासहित देशातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशाच्या पूर्वेकडील काही भागात तर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज 16 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, कोकण किनारपट्टीसह कर्नाटकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, कराईकल आणि माहेच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. तसेच काही ठिकाणी आज पासून 18 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार असे सांगितले जात आहे.

देशातील हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही भागात आज हिमवृष्टी होईल असे हवामान विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आपल्या राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस पाऊस पडत राहील असा अंदाज आहे.

कोकणात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. आज कोल्हापूर सह कोकणातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ आणि तामिळनाडू मध्ये देखील पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एकंदरीत 18 तारखेपर्यंत देशातील विविध भागात पावसाची शक्यता आहे.

यानंतर मात्र पाऊस विश्रांती घेईल आणि थंडीचा कडाका वाढेल असे सांगितले जात आहे. वास्तविक या वर्षी आपल्या महाराष्ट्रसहित देशातील विविध भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे परतीचा पाऊस तरी मनसोक्त बर असला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

यासाठी शेतकरी बांधव देवाकडे साकडे घालत आहेत. दरम्यान सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात शेतकऱ्यांचे हे साकडे पूर्ण होईल आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आता तयार होत आहे. जर हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर मान्सूनच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. 

Leave a Comment