मुंबईकरांसाठी खुशखबर ! समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तयार होणाऱ्या ‘या’ मार्गाच्या भूसंपादनाला आणि आखणीला राज्य शासनाची मंजुरी, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूककांचा बिगुल वाजणार आहे. यामुळे शासनाच्या माध्यमातून देखील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अशातच मुंबईसह कोकणातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाला. या मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरविर हा देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. विशेष बाब अशी की हा संपूर्ण मार्ग या चालू वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

अशातच समृद्धी महामार्गाच्या धरतीवर महाराष्ट्रात आणखी एका नवीन महामार्गाची निर्मिती केली जाणार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग 388.45 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दरम्यान या महामार्गाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गासाठी चार टप्प्यांतील एकूण ३८८.४५ किलोमीटर मार्गाच्या अंतिम आखणीला व भूसंपादनाला राज्य सरकारने गुरुवारी अर्थातच सहा जुलै 2023 रोजी मान्यता दिली आहे. खरंतर हा महामार्ग तयार करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला आहे.

हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित होणार आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच विकसित केला जाणार आहे. हा एक ग्रीनफिल्ड महामार्ग राहणार आहे. या नुसार एमएसआरडीसीने या मार्गासाठी विविध पर्यायी आखणींचा अभ्यास केला आहे.

आणि आता या मार्गाचा चार टप्प्यांतील अंतिम आखणी प्रस्ताव देखील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. आता या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जीआर देखील निर्गमित करण्यात आला आहे.

असं सांगितलं जात आहे की, हा महामार्ग कोकण किनारपट्टीच्या किनाऱ्यालगत उभारला जाणार असल्याने या मार्गावरून प्रवास करताना निसर्गाचे सौंदर्य प्रवाशांना आपल्या डोळ्यांनी कैद करता येणार आहे. 

Leave a Comment