Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसात आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला आहे. तसेच या चालू महिन्यात नवरात्र उत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे.
15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल आणि त्याच दिवसापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा होणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काल राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल शेतकऱ्यांसाठी देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्याचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर केंद्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान प्रमाणेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना देखील वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे याही योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. म्हणजेच पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकऱ्याचे 6 हजार असे एकूण 12,000 आता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. दरम्यान, काल नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे आता या योजनेचा पहिला हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. एवढेच नाही तर या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा देखील दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा 15 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच येत्या चार दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील जवळपास 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार आहे.
सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे या योजनेचा दुसरा हप्ता लगेचच पुढील महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी राज्य शासनाकडून तयारी केली जात आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा एप्रिल ते जुलै या काळातील पहिला हफ्ता 15 ऑक्टोबर पर्यंत मिळणार आहे.
यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंतचा दुसरा हप्ता हा पुढील महिन्यात पात्र शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. तसेच तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चअखेर देणे प्रस्तावित राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार या योजनेचा पहिला हप्ता हा नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आग्रही आहे.
विशेष म्हणजे वर्तमान कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील या योजनेचा पहिला हप्ता हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जावा यासाठी आग्रही आहेत. यामुळे या योजनेचा पहिला हप्ता हा नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच वितरित होणार असे जवळपास निश्चित होत आहे.
मात्र पीएम मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. याचे वितरण नेमके केव्हा होणार याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही, परंतु 15 ऑक्टोबर पर्यंत या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.