Navin Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसांच्या खंडानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाला सुरुवात झाली आणि यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला. संकटात आलेली खरिपातील पिके पुन्हा एकदा नवीन जोमाने डोलू लागली. सर्वत्र समाधानाचे वातावरण तयार झाले.
सात सप्टेंबर पासून ते 9 सप्टेंबर पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी तर अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. मात्र सप्टेंबर पासून अर्थातच कालपासून राज्यातून मोठ्या पावसाने काढता पाय घेतला आहे. कोकण वगळता राज्यातील बहुतांशी भागातून मोठा पाऊस आता पुन्हा एकदा ओसरला आहे.
यामुळे पुन्हा एकदा पाऊस गायब होणार की काय? अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या राज्यातील काही भागात हलका पाऊस पडू शकतो.
अर्थातच आज आणि उद्या राज्यात मोठा पाऊस पडणार नाही. मात्र 13 सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा मोठ्या पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असे आएएमडीने सांगितले आहे. 13 सप्टेंबर नंतर राज्यात पावसाचा जोर वाढेल मात्र हा जोर विदर्भात अधिक राहणार आहे.
खरतर, रविवारपासून म्हणजेच कालपासून राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर हा कमी झाला आहे. सध्या फक्त कोकण विभागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही तुरळक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतं आहे. दरम्यान उद्यापर्यंत राज्यात हलकाच पाऊस राहणार आहे.
पण 13 सप्टेंबर नंतर बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीय प्रणाली तयार होणार असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान राज्यातील कोकण आणि विदर्भ या दोन्ही भागात पावसाचा जोर वाढू शकतो असे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे यासंबंधीत भागातील शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.