Onion Rate Ahmednagar : गेल्या एका महिन्यापासून राज्यात कांद्याचे भाव कडाडले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, गेली पाच ते सहा महिने म्हणजेच जानेवारी महिन्याच्या अखेर पासून ते जून महिन्यापर्यंत कांदा बाजार दबावात होता.
यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र आता गेल्या जुलै महिन्यापासून कांदा बाजार तेजीत आला आहे. राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख बाजारात कांद्याला सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 1,500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे.
विशेष म्हणजे राज्यातील काही प्रमुख बाजारात कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळू लागला आहे. काही बाजारात याहीपेक्षा अधिक भाव मिळू लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कांद्याच्या बाजारभावात चांगलीच वाढ झाली आहे.
काल सोमवारी अर्थातच 31 जुलै 2023 रोजी झालेल्या लिलावात राहुरी वांबोरी, नेवासा घोडेगाव, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदाला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
अहमदनगरमध्ये काय भाव मिळतोय ?
नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव आवारात काल 41 हजार 851 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. यात कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 6,250 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2301 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल कमाल बाजार भाव 2,000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच होते. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये 9 हजार 30 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. काल झालेल्या लिलावात यां मार्केटमध्ये कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि अकराशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.