काय सांगता ! ‘या’ कारणाने पंजाब डख यांचा हवामान अंदाज चुकला, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Havaman Andaj : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पंजाब डख हे नाव विशेष लोकप्रिय झाले आहे. हवामान अंदाजासाठी हे नाव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ख्यातीनाम बनले आहे. महाराष्ट्रात कदाचित असा एखादाच व्यक्ती असेल ज्याला पंजाब डख हे नाव माहिती नाही.

शेतकरी सांगतात की, पंजाब डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरतो. डख यांच्या हवामान अंदाजामुळे शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना मदत होत असल्याचा दावा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे.

विशेष बाब अशी की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डख यांचा हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरत आहे. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये पंजाब डख यांचा हवामान अंदाज पूर्णपणे फोल ठरला आहे. खरंतर एप्रिल मे महिन्याच्या काळात डख यांनी यंदा मान्सूनच आगमन 8 जूनला होईल असा अंदाज व्यक्त केला होता.

तसेच त्यांनी जून महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता देखील वर्तवली होती. 22 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचून जाईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. एवढेच नाही तर जुन अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असा दावा देखील डख यांनी केला होता. डख यांनी केलेल्या या दाव्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण केल्यात.

पाऊस पडेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बी बियाणे आणि खतांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र अजूनही राज्यात समाधानकारक पाऊस पडालेला नाही. मान्सून अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. यामुळे डख यांच्या चुकीच्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

यावरून सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या चर्चा रंगत आहेत. वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. काही लोक डख यांना सपोर्ट करत आहेत तर काही लोक त्यांच्या चुकीच्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांचा बट्ट्याबोळ झाल्याचा ओरड करत आहेत. डख यांच्या चुकीच्या अंदाजामुळे व्यापारी मालामाल झाले असून शेतकरी देशोधडीला लागल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, यासंबंधी चार दिवसांपूर्वी पंजाब डख यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये पंजाब डख यांनी पाऊस का लांबला याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. खरतर जवळपास दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने डख यांचा हवामान अंदाज खरा ठरत आहे. पण यंदा त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला आहे. यामुळे त्यांचा अंदाज का चुकला? याबाबत सध्या शेतकऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

डख यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी चक्रीवादळामुळे मान्सून कमकुवत झाल्याचे स्पष्ट केले आहे. वादळ बाष्प ओढून घेऊन गेल्याने मान्सून कमकुवत झाला असून २०१५लाही अशीच परिस्थिती तयार झाली होती आणि चक्रीवादळामुळे बाष्प वाहून गेलं होतं. असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जमिनीमध्ये ओल आली तरच पेरणी करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच जर चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्याला धडकलं असतं तर पाऊस झाला असता, असही त्यांनी सांगितलं आहे. तसेच जमिनीत एक वित ओल आल्याशिवाय पेरणी करु नये, असं त्यांनी सांगितलं आहे. एकंदरीत, बिपरजॉय चक्रीवादळामुळे डख यांना हवामानाचा अंदाज बांधता आला नाही.

Leave a Comment