निसर्गाचे मोठे संकेत, ‘या’ कारणामुळे आता अवकाळी पाऊस विश्रांती घेणार ! पंजाबराव डख काय म्हणताय ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशा त्राहिमाम माजवला होता. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली.

काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती-पिक भुई सपाट झाले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस बरसला यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

अशातच मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. पावसाने आता उघडीप दिली आहे.

पण काही ठिकाणी ढगाळ हवामान कायम आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील आग्नेयककडील जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण विदर्भात आगामी काही दिवस हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे.

अशातच मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब रावांनी देखील एक महत्वाची माहिती दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात आता धुई, धुके धुराळी पडत आहे. म्हणून आता राज्यात अवकाळी पाऊस विश्रांती घेणार आहे.

पंजाबराव सांगतात की जेव्हा पण हिवाळ्यात सातत्याने अवकाळी पाऊस बरसतो आणि मग अचानक अशा प्रकारची जाळी, धुळी, धुके, धुराळी येते तेव्हा अवकाळी पाऊस विश्रांती घेत असतो.

म्हणजेच निसर्गात होणारे हे महत्त्वाचे बदल मोठे संकेत देतात. म्हणजेच आता राज्यात धुई, धुके मोठ्या प्रमाणात येत असल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे सत्र आता संपणार आहे.

निश्चितच अवकाळी पाऊस थांबला तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट खूपच दिलासादायी राहणार आहे. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. 

Leave a Comment