पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात होणार, किती दिवस पाऊस पडणार? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला आहे. एक जुलै ते सहा जुलै या काळात राज्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला आहे. गेल्या आठ दिवसांच्या काळात महाराष्ट्रासहित देशातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असून देशातील जवळपास आठ राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पूरसदृश्य परिस्थितीमुळे या संबंधित राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यामध्ये आसाम राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे. आसाममधील सहा जिल्ह्यात पूर आला आहे आणि जवळपास 22 हजार लोकांना याचा फटका बसला आहे.

मात्र महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. जवळपास जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा संपत चालला आहे मात्र राज्यात कोकण आणि घाटमाथा वगळता उर्वरित भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही.

यामुळे खरीप हंगाम प्रभावित होत असून बहुतांशी भागातील पेरण्या लांबल्या आहेत. काही भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, मात्र पेरणीनंतर पावसाने खंड दिला आहे. यामुळे सध्या राज्यातील शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी काल अर्थातच 10 जुलै रोजी आपला एक नवीन सुधारित हवामान अंदाज जारी केला आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात उद्यापासून अर्थातच 12 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 12 जुलैपासून ते 15 जुलै पर्यंत अर्थातच येत्या बुधवारपासून ते शनिवार पर्यंत राज्यात रोजाना भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

या कालावधीमध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असा सर्वत्र भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. डख म्हणतायेत की, ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अजून झालेल्या नसतील त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या या कालावधीत पडणाऱ्या पावसामुळे पूर्ण होणार आहेत.

तसेच राज्यात 19 जुलै नंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 19 जुलै नंतर मात्र किती दिवस पाऊस पडणार आणि कोणत्या भागात पाऊस पडणार याबाबत डख यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात ते नवीन हवामान अंदाज देतील त्यावेळी याबाबत योग्य ती स्पष्टोक्ती येणार आहे.

Leave a Comment