चर्चा तर होणारच ! ‘सरपंच’ अन ‘आमदार’ बैल ठरले लाखमोलाचे, कोल्हापूरच्या खिलारी बैलजोडीला मिळाला तब्बल साडेसहा लाखाचा दर, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral News : शेतकऱ्याचे आणि त्याचा दावणीला बांधलेल्या बैलाचे नाते हे अगदी पिता-पुत्राच्या नात्याप्रमाणे असते. शेतकरी आपल्या दावणीला बांधलेल्या जनावरावर अतोनात प्रेम करतात. दावणीला बांधलेले जनावरे हे शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात.

खरतर अनेक शेतकरी हे खूप हौशी असतात. ते आपल्या दावणीला जातिवंत बैल ठेवतात. अलीकडे ट्रॅक्टरच्या वापरामुळे बैल जोडीचे प्रमाण कमी झाले असले तरी देखील काही हौशी शेतकरी शेतकऱ्याची शान म्हणून बैल जोडी आवर्जून बाळगतात. तर काही शेतकरी या यांत्रिकीकरणाच्या काळातही बैलजोडीच्या सहाय्यानेच शेतीची कामे करण्यास पसंती दाखवतात.

शेतकऱ्यांच्या मते ज्या शेतकऱ्याकडे बैल जोडी नाही तो शेतकरीच नाही. बैल जोडी ही शेतकऱ्याची आन, बाण आणि शान आहे. गडहिंग्लज येथील काशिनाथ शंकर बेळगुद्री हे देखील असेच एक शेतकरी आहेत जे या यांत्रिकीकरणाच्या युगातही शेतीची कामे बैलजोडीच्या सहाय्याने करण्यास पसंती दाखवतात.

काशिनाथ यांच्या दावणीला जातिवंत गाई आणि म्हशी यांच्याबरोबरच खिल्लारी जातीची बैल जोडी देखील असते. काशिनाथ यांनी सहा महिन्यांपूर्वी वाळवा तालुक्यातील बावची येथील एका शेतकऱ्याकडून तब्बल पावणे तीन लाखाला एक बैल खरेदी केला. बैलाचे नाव सरपंच असे होते.

यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात कर्नाटक मधून एका व्यापाऱ्याकडून दोन लाखाला आणखी एक खिल्लारी बैल आणला. सहा महिन्यांपूर्वी जो बैल खरेदी केला त्याला सरपंच असे नाव होते. यामुळे गेल्या महिन्याभरापूर्वी खरेदी केलेल्या बैलाला त्यांनी आमदार असे नाव दिले.

दरम्यान चार जुलैला गडहिंग्लज येथे सदृढ बैल जोडी स्पर्धेचे आयोजन झाले होते. या स्पर्धेमध्ये काशिनाथ यांनी नव्याने खरेदी केलेली ही सरपंच-आमदार बैल जोडी देखील समाविष्ट झाली होती. ही बैल जोडी कोणालाही भावेल एवढी मनमोहक दिसत होती.

यामुळे या स्पर्धेतील बैल जोडीचे फोटो वेगाने सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेत. सोशल मीडियामध्ये अनेक शेतकऱ्यांना या बैल जोडीने मोहून घेतले. या बैल जोडीचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ही जोडी रातोरात फेमस झाली.

पुणेच्या धायरी येथील शेतकरी पांडुरंग चौधरी यांनी देखील या जोडीचे व्हिडिओज आणि फोटो पाहिलेत. यानंतर चौधरी यांनी ही बैलजोडी बैलपोळ्यासाठी खरेदी करण्याचा प्लॅन आखला आणि तब्बल सहा लाख 51 हजाराला ही बैल जोडी त्यांनी खरेदी केली.

गडहिंग्लज परिसरात एवढ्या विक्रमी दरात विक्री होणारी ही पहिलीच बैल जोडी असावी असा दावा सध्या परिसरात केला जात आहे. दरम्यान, काशिनाथ बेळगुद्री यांना सहा महिन्यात तब्बल पावणे दोन लाख रुपयांचा नफा झाला. मात्र ही परफेक्ट बैल जोडी लवकरच घरातून गेल्यामुळे काशिनाथ व त्यांच्या परिवाराला गहिवरून आले. 

Leave a Comment