सुरत-चेन्नई महामार्गाचे काम बंद पडले का ? सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Surat Chennai Greenfield Expressway : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

केंद्र शासनाच्या या महत्वकांक्षी परियोजनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली सर्व महामार्गे ही ग्रीन फील्ड महामार्ग राहणार आहेत. यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाचा देखील समावेश होतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गासंदर्भात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

शेतकऱ्यांचा विरोध पाहता या महामार्गासाठी सुरू असणारे जमीन हस्तांतरणाचे काम बंद झाल्याचे वृत्त देखील गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल होत होते. यामुळे या महामार्गाबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. या महामार्गाच्या कामासंदर्भात संभ्रमावस्था नागरिकांमध्ये पाहायला मिळत होती.

अशातच या महामार्गासंदर्भात एक महत्त्वाची माहिती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितल्याप्रमाणे, सुरत चेन्नई ग्रीन फील्ड महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणाचे काम बंद झालेले नाही. हे काम सध्या सुरू आहे.

महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या जाणार आहेत. सोबतच रेडी रेकनर नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला जात असल्याचे देखील जिल्हाधिकारी महोदय यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे जमीन हस्तांतरणाचे काम बंद असल्याच्या ज्या चर्चा रंगत होत्या त्या चर्चांना जिल्हाधिकारी महोदय यांनी पूर्णविराम लावला आहे. जिल्हाधिकारी महोदय यांनी सांगितले की, या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या विकासात मोलाची भर पडणार आहे.

तसेच महामार्गाचे काम नियमाप्रमाणे सुरू असून या मार्गामध्ये बाधित होणाऱ्या काही शेतकऱ्यांना मोबदला दिला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या मार्गामध्ये बाधित होणाऱ्या आणखी काही शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या जाणार असून त्यांना देखील नियमाप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.

महामार्गाची अन्य कामे बंद नसून ती चालूच आहेत. कर्नाटक, तेलंगाना व आंध्र प्रदेश या राज्यात जाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करावा लागतो. यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यात महामार्गाचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे.

यामुळे सोलापूर जिल्ह्याचे चित्र आगामी काळात पूर्णपणे पालटले जाणार असून जिल्ह्याचा विकास सुनिश्चित होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे परिसराचा विकास सुनिश्चित होणार असून यामुळे स्थानिक रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा देखील जिल्हाधिकारी महोदय यांनी यावेळी केला आहे.

शेतकऱ्यांच्या विरोधावर काय म्हटले जिल्हाधिकारी

सोलापूर जिल्ह्यात या महामार्गाचा मोठा विरोध झाला आहे. या मार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला जाणारा मोबदला हा खूपच तुटपुंजी असल्याचे नमूद केले असून यासाठी ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत.

शेतकऱ्यांनी महामार्ग मध्ये बाधित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात वाढीव दर दिला पाहिजे अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

शेतकऱ्यांच्या या मागणीवर मात्र शासनाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेडी रेकनर नुसार बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जात असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे शेतकऱ्यांकडून बाधित जमिनीच्या मोबदल्यात दिला जाणारा दर हा खूपच कमी असल्याची तक्रार केली जात आहे तर दुसरीकडे जिल्हाधिकारी महोदय यांनी बाधित शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला हा नियमाप्रमाणे असून यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असा दावा केला आहे.

Leave a Comment