Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावं डख यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती दिली आहे. खरंतर महाराष्ट्रात गेल्या सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला.
मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस झालेला नाही. अशा स्थितीत त्या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात ज्या भागात पाऊस झालेला नाही तिथे आगामी काही दिवसांमध्ये भीषण पाणी संकट तयार होणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात देखील चांगला पाऊस झाला पाहिजे असे वाटत आहे. अशातच मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावं यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडणार नाही. वास्तविक पंजाबरावांनी आपल्या गेल्या हवामान अंदाजात नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यात पुन्हा पाऊस पडू शकतो असे सांगितले होते.
परंतु 3 ऑक्टोबर 2023 रोजी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजात पंजाबरावांनी नवरात्र उत्सवात यावर्षी पाऊस पडणार नाही असे सांगितले आहे. पंजाबरावांच्या मते, दसरापर्यंत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडणार नाही.
यामुळे ज्या भागात सप्टेंबर महिन्यात खूप कमी पाऊस झाला आहे तेथील शेतकऱ्यांसाठी ही चिंताजनक बातमी राहणार आहे. तर ज्या भागात गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाला आहे आणि सध्या सोयाबीन तसेच मका हार्वेस्टिंगला आली आहेत अशा शेतकऱ्यांसाठी मात्र ही बातमी दिलासा देणारी राहणार आहे.
वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून यावर्षी विजयादशमीच्या काळात पाऊस पडणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान या प्रश्नाचे उत्तर पंजाबरावांनी दिले असून यावर्षी विजयादशमीच्या काळात महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडणार नाही असे त्यांनी नमूद केले आहे.
दिवाळीत पाऊस पडणार का ?
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, ऑक्टोबर महिन्यात 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. पण 25 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या काळामध्ये राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. तसेच यंदा दिवाळीत पावसाची शक्यता राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी सांगितले की, यावर्षी जून महिन्यात पाऊस पडला नाही पण जुलैमध्ये पडला. ऑगस्टमध्ये पाऊस पडला नाही पण सप्टेंबरमध्ये पडला. आता पुढे देखील अशीच परिस्थिती राहिल आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडणार नाही पण नोव्हेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडेल.