Panjabrao Dakh Havaman Andaj July-Aug 2023 : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जवळपास सात ते आठ दिवस पावसाने उघडीप दिली. आता मात्र राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, पुण, कोल्हापूर, सातारा तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज आहे.
खरंतर, खरीप हंगामातील पिकांना आता जोमदार वाढीसाठी जोरदार पावसाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत. राज्यात रिमझिम पाऊस पडत आहे मात्र अजूनही जोरदार पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाबाबत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
यंदा दुष्काळाचे सावट तयार होत असल्याचे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. मात्र शेतातच आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले पंजाब डख यांनी एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे.
खरंतर पंजाबराव दररोज राज्यातील वेगवेगळ्या भागात जात असतात. शेतकरी मेळाव्यात सामील होत असतात. शेतकऱ्यांना हवामान अंदाजाबाबत माहिती देतात सोबतच शेतीविषयक सल्ले देखील देतात.
अशातच, पंजाबरावांनी नुकत्याच नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात आयोजित झालेल्या एका शेतकरी मेळाव्यात राज्यात आगामी काही दिवस कसं हवामान राहणार ? याबाबत महत्त्वाची अपडेट मेळाव्यात उपलब्ध शेतकऱ्यांना दिली आहे.
पंजाबरावांच्या या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात पुढील 12 दिवस काही भागात पावसाची शक्यता राहणार असल्याचे चित्र आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, 17 ते 19 जुलै उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे.
या कालावधीत नासिक जिल्ह्यातील सटाणा शहर व आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून ओढे-नाले वाहतील असा पाऊस पडेल असं त्यांनी नमूद केले आहे.
तसेच 24 ते 26 जुलै पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे आणि यानंतर 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे.
निश्चितच, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात अजूनही अपेक्षित असा पाऊस पाहायला मिळालेला नाही.
यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता लागून आहे. अशा परिस्थितीत डख यांनी उत्तर महाराष्ट्रात आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.