Panjabrao Dakh Havaman Andaj : हवामान विभागाने नुकताच एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात खूपच कमी पावसाचा अंदाज आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून या दोन्ही महिन्याच्या सरासरीच्या केवळ 98 टक्के पाऊस पडणार असे आय एम डी ने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे. निश्चितच आय एम डी चा हा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे.
जरूर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 17 टक्के अधिक पावसाची हजेरी लागली आहे. मात्र जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस पडला तर यामुळे खरीपातील पिकांवर विपरीत परिणाम होण्याचा अंदाज आहे.
यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही सरासरी एवढा पाऊस झाला पाहिजे अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी देखील ऑगस्ट महिन्याच्या पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात पाच ते सहा ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र 13 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे.
13 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार असे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब रावांनी यावेळी व्यक्त केले आहे. विशेष बाब अशी की 15 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर वाढणार आहे. अर्थातच 15 ऑगस्ट नंतर राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. निश्चितच पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
एकंदरीत हवामान विभागाने पुढील दोन महिने राज्यात कमी पाऊस राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे तर पंजाबरावांनी ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आता कोणाचा हवामान अंदाज खरा ठरतो आणि ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील पाऊसमान कस राहत हे जाणून घेणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.