Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या 9 ते 10 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या दीर्घकालीन हवामान अंदाजात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
या दोन महिन्यात सरासरीच्या 98 टक्के एवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. आधीच काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यंदा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. एल निनोमुळे यंदा कमी पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
अशातच मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यंदाच्या पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, केल्या काही वर्षांपासून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू 22 दिवस पुढे सरकले आहे.
यामुळेच यावर्षी 22 दिवस उशिराने पावसाच आगमन झाले आहे. मात्र पावसाचे आगमन उशिराने झाले असले तरी देखील शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. कारण की, पाऊस यावर्षी उशिराने जाणार आहे. यंदा जवळपास दिवाळीपर्यंत जोरदार पाऊस पडणार असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.
शिवाय, यावर्षी देखील गेल्या वर्षी प्रमाणेच मान्सून राहणार असून राज्यातील सर्व तळे यावर्षी फुल भरतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. निश्चितच, यंदा पाऊस कमी पडेल अशी शेतकऱ्यांना वाटणारी भीती यामुळे कमी होणार आहे. दरम्यान त्यांनी ऑगस्ट महिन्यातील पावसाबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.
ते म्हटले की, आता राज्यात 15 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर खूपच कमी राहणार आहे. यानंतर मात्र जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 18 ते 19 ऑगस्ट पासून राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.