Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा. दरवर्षी दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशी महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो. यावर्षी दर्श पिठोरी अमावस्या 14 सप्टेंबरला येत आहे. म्हणजेच यंदा 14 सप्टेंबरला बैलपोळा साजरा केला जाणार आहे.
खरंतर, महाराष्ट्रात दरवर्षी बैलपोळ्याच्या सणाला पावसाची हजेरी ठरलेलीच असते. राज्यात सगळीकडेच पाऊस पडतो असे नाही पण बैलपोळ्याच्या दिवशी राज्यातील काही भागात शंभर टक्के पावसाची हजेरी लागतेच. यामुळे यावर्षीही बैलपोळ्यात पाऊस पडणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी आज अर्थातच 9 सप्टेंबर 2023 रोजी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात याबाबत सर्व माहिती दिली आहे. आज आपण पंजाबरावांचा हाच नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हटले पंजाबराव?
पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामानांना जात त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यात आता 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणजेच या कालावधीत सर्वदूर पाऊस पडणार नाही परंतु भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे. तसेच राज्यात बैलपोळ्याला अर्थातच 14 सप्टेंबरला पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
14 सप्टेंबर पासून ते 16 सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस होणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. याचाच अर्थ यंदा बैलपोळ्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबरपासून सुरू होणारा पाऊस सर्वप्रथम पूर्व विदर्भ त्यानंतर पश्चिम विदर्भ मग उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर मग हळूहळू संपूर्ण राज्यात पसरणार आहे. मात्र 16 सप्टेंबर नंतर राज्यात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यात खूप मोठा पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कालावधीत राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार असे देखील त्यांनी नमूद केले आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, पुणे तसेच मांजरा धरणाला ज्या भागातून पाणी येते त्या भागात या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
या कालावधीत होणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्यातील मांजरा, उजनी आणि जायकवाडी या महत्त्वाच्या धरणात पाण्याची मोठी आवक वाढणार असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच या कालावधीत राज्यातील अनेक छोटी धरणे 100% क्षमतेने भरणार असेही त्यांनी सांगितले आहे.