पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ! जुलै महिन्यात ‘या’ तारखेपासून वाढणार पावसाचा जोर, महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News : राज्यात जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. जवळपास 20 दिवसाच्या खंडानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून मौसमी पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागातील हवामान आल्हाददायक बनले आहे.

पण राज्यातील कोकण आणि नासिक, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा वगळता राज्यातील उर्वरित भागात पावसाची फक्त रिपरिपच पाहायला मिळत आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात अजूनही समाधानकारक पाऊस पाहायला मिळालेला नाही.

ज्या भागात पुरेसा पाऊस पडला आहे त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस झालेला नाही तेथील शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे ती पंजाबराव डख यांच्या माध्यमातून.

पंजाब डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आता राज्यात लवकरच मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भात देखील पडणार आहे. यामुळे मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे चित्र तयार होत आहे.

केव्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार?

डख यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मुंबई, पुणे नासिक आणि कोकणपट्टी भागात संततधार पाऊस सुरू असतो तेव्हा राज्यातील उर्वरित भागात केवळ जोरदार वारे वाहते. अर्थातच तिकडे संततधार पाऊस सुरू असला की राज्यातील उर्वरित भागात पाऊस पडत नाही. मात्र आता राज्यातील उर्वरित भागात देखील पावसासाठी पोषक हवामान तयार होऊ लागले आहे.

3 जुलैपासून अर्थातच उद्यापासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्या भागात आता पावसाला सुरुवात होणार आहे. तीन जुलै पासून ते नऊ जुलै पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडणार आहे.

यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर अधिक राहणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नसतील त्यांच्या पेरण्या 10 जुलैपर्यंत पूर्ण होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच ज्या भागात 10 जुलैपर्यंत पेरणी योग्य पाऊस होणार नाही त्या भागात 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान चांगला पाऊस पडेल असा अंदाज डख यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या 10 जुलैपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होणार नाहीत त्यांच्या पेरण्या 15 जुलैच्या सुमारास पूर्ण होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

एकंदरीत, आता राज्यात उद्यापासून सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे डख यांचा हा अंदाज शेतकऱ्यांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचे काम करेल आणि शेतशिवारात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची लगबग वाढेल असे चित्र तयार होत आहे.

Leave a Comment