शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; जुलै महिन्यातील शेवटचे 8 दिवस कसं राहणार हवामान ? पंजाब डख यांचा पावसाबाबतचा अंदाज वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक आहे.

आज भारतीय हवामान विभागाने पालघर, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर या सहा जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्टही जारी केला आहे. याव्यतिरिक्त आज सातारा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून आयएमडीने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

एकंदरीत आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अशातच आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी जुलै महिन्यातील शेवटचे आठ दिवस कस हवामान राहणार ? याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

कसं राहणार हवामान ?

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 22 जुलै म्हणजेच आजपासून ते 25 जुलै पर्यंत राज्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यात 28 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा पाऊस पडण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

विशेष बाब अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात दुष्काळ पडणार अशा चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत्या. मात्र यंदा दुष्काळ पडणार नाही असे पंजाबरावांनी सांगितले आहे.

एकंदरीत जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असल्याने सध्या सर्वत्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु काही भागात अतिवृष्टी झाली असल्याने तेथील शेती पिके संकटात आली आहेत.  

Leave a Comment