Panjabrao Dakh News : जुलै महिन्यात जोरदार बरसणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने एक महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड राहणार आहे. या दोन्ही महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. खरंतर गेल्या महिन्यात काही भागात अतिवृष्टी झाली आणि यामुळे परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने पुरस्थिती निवळली आहे.
जास्तीच्या पावसाने दाणाफान झालेले जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागले आहे. अशातच मात्र पंजाबराव डख यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर गेल्यावर्षी 15 ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्य दिन भर पावसात साजरा करावा लागला होता.
गेल्या वर्षी अनेक भागात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली होती. यंदा मात्र भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावर जर विश्वास ठेवला तर अशी परिस्थिती फारच कमी भागात पाहायला मिळू शकते. परंतु पंजाबराव डख यांनी वेगळाच हवामान अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पाच ऑगस्टपर्यंत भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. 5 ऑगस्ट नंतर मात्र राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्व दूर पावसाचे उघडीप पाहायला मिळू शकते असं त्यांनी यावेळी नमूद केल आहे.
मात्र 13 ऑगस्ट नंतर राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. 13 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट पासून राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज यावेळी पंजाबरावांनी व्यक्त केला आहे.
याचाच अर्थ यंदाही गेल्यावर्षीप्रमाणेच स्वातंत्र्य दिन पावसातच साजरा करावा लागणार असे सांगितले जात आहे. दरम्यान पंजाबरावांनी शेतकरी बांधवांना 13 ऑगस्टपर्यंत शेतीची सर्व कामे उरकून घ्यावीत असा सल्ला देखील यावेळी दिला आहे.