शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! गव्हाच्या ‘या’ तीन नवीन वाणातून शेतकऱ्यांना मिळणार अधिकचे उत्पादन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : सध्या देशात खरीप हंगाम सुरु आहे. खरीप हंगामातील पिके आता दीड ते दोन महिन्यांची झाली आहेत. काही भागात पाऊस उशिराने दाखल झाला असल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरणी करून एका महिन्याचा काळ उलटला आहे.

दरम्यान खरीप हंगामानंतर गव्हाचा हंगाम सुरू होणार आहे. म्हणजेच रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. खरंतर रब्बी हंगामात विविध पिकांची शेती शेतकरी बांधव करतात. मात्र गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातही गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

दरम्यान संपूर्ण देशभरातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी गव्हाच्या नवीन जाती संशोधित करण्यात आल्या आहेत. ICAR भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेने गव्हाच्या तीन नवीन जाती विकसित केले आहेत.

या नव्याने विकसित झालेल्या गव्हाच्या जाती बायोफोर्टिफाईड असून या जाती अधिक उत्पादनासाठी ओळखल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या नव्याने विकसित झालेल्या तीन जातींविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या आहेत या जाती?

करण वैदेही म्हणजे डीबीडब्ल्यू 370, करणं वृंदा म्हणजे डीबीडब्ल्यू 371, करण वरुणा म्हणजे डीबीडब्ल्यू 372 अशी या नव्याने विकसित झालेल्या जातींची नावे आहेत. या तीनही जाती उत्पादनाच्या बाबतीत इतर सामान्य जातीच्या तुलनेत सरस आहेत.

या जाती विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, करण वृंदा या जातीपासून सरासरी 71 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. मात्र जर पिकाचे योग्य नियोजन केले तर या जातीपासून 87 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन देखील मिळू शकते.

तसेच करण वरूणा या जातीपासून कमाल 84.9 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंतचे उत्पादन मिळू शकते. विशेष म्हणजे या जातीपासून 75 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे सरासरी उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

या तीनही जाती तांबेरा रोगाशी लढण्यास देखील सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच तांबेरा रोगामुळे उत्पादनात मोठी घट येते, यामुळे जर या जाती तांबेरा रोगास लढण्यास सक्षम असल्या तर यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. 

Leave a Comment