Panjabrao Dakh Rain Update News : भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा वगळता राज्यात संपूर्ण महिनाभर पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे पहिल्या आठवड्यात देखील तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. खरंतर जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. अनेक भागात अतिवृष्टी झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

मात्र आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून पूरस्थिती देखील निवळत चालली आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यातही कमी पावसाचा अंदाज आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

पंजाबरावांनी ऑगस्ट महिन्यातील आपला हवामान अंदाज 31 जुलै 2023 रोजी जारी केला आहे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाबरावांनी आपल्या सुधारित हवामान अंदाजात काय म्हटल आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

काय म्हणताय पंजाबराव डख

पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, एक ऑगस्टपासून राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र असे असले तरी एक ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

या कालावधीत ज्या भागात पाऊस पडेल तिथे पंधरा ते वीस मिनिटे पाऊस राहील आणि त्यानंतर लगेच ऊन पडेल असे समिश्र वातावरण राहणार आहे. चार तारखेपर्यंत ऊन पावसाचा हा खेळ सुरू राहणार आहे. मात्र तदनंतर राज्यातून पाऊस थोडाकाळ विश्रांती घेणार असा अंदाज आहे.

जवळपास 13 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज आहे. मात्र 13 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. 14 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता पंजाबराव यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Advertisement

पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा आणखी अडीच ते तीन महिने आहे. यामुळे यंदा राज्यात दुष्काळ पडणार नसून चांगला पाऊस राहणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.

तसेच यंदा राज्यातील सर्व प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. यंदा जवळपास दिवाळीपर्यंत पाऊस पडत राहणार असे त्यांनी सांगितले आहे. एकंदरीत जुलैमध्ये जोरदार बरसणारा पाऊस आता ऑगस्टमध्ये थोडा काळ विश्रांती घेणार असल्याचे चित्र आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *